राज ठाकरेंची जॉर्ज फर्नांडिस यांना व्यंगचित्राच्या माध्यमातून श्रद्धांजली

raj-thakre
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून कामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात ‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला, असे म्हटले आहे.


मंगळवारी सकाळी दिल्लीतील रुग्णालयात जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी नेत्यांनी फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मंगळवारी दुपारी राज ठाकरे यांनी देखील ट्विटरवर व्यंगचित्र शेअर करत जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला, असे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.

Leave a Comment