सलील कुलकर्णींच्या ‘वेडिंग चा शिनेमा’चा टीझर रिलीज

salil-kulkarni
गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक अशा विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारा सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच त्याच्या ‘वेडिंग चा शिनेमा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं, कुणी जेवल्यावाचून नाही जायचं हं’ हे लग्नाचे बोल आपणाला या टीझरमध्ये ऐकायला मिळतात.

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार या चित्रपटात झळकणार आहेत. सलील कुलकर्णी यानेच या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन केले असून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा एक निखळ आनंद देणारा एक प्रसन्न अनुभव असणार आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment