कामगार चळवळीचे प्रणेते जॉर्ज फर्नांडीस कालवश

george-fernandes
नवी दिल्ली – दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून स्वाईन फ्ल्यू आजाराने ग्रस्त होते. मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जॉर्ज फर्नांडीस राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचा बिहारमधील मुझ्झफरपूर हा मतदार संघ होता. त्यांनी केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीसोबतच त्यांनी पत्रकारीताही यशस्वीरित्या पार पाडली. समता पक्षाची फर्नांडीस यांनी स्थापना केली. तसेच त्यांनी मुंबईतील कामगारांसाठी अनेक लढे दिल्यामुळे त्यांना मुंबई कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जात होते.