कुंभमेळ्यात योगी सरकारची मंत्रिमंडळ बैठक

cabinet
प्रयागराज कुंभ येथे गंगेकाठी सुरु असलेल्या कुंभमेळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक घेत असून आज मंगळवारी सकाळी ११ वा. ही बैठक होत असल्याचे उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगितले. कुंभ मेळ्यातील इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरमध्ये ही बैठक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री योगी सकाळी कुंभमेळ्यात पोहोचत असून बैठकीपूर्वी ते हनुमान दर्शन घेऊन गंगेत पवित्र स्नान करणार आहेत. तय्च्यासोबत काही मंत्रीही पवित्र स्नान करतील आणि नंतर ४५० वर्षानंतर खुल्या केल्या गेलेल्या अक्षय वट आणि सरस्वती कूपचे दर्शन घेतील. त्यानंतर बैठक होणार असून दुपारी मुख्यमंत्री आखाडा पदाधिकारी आणि साधूसंत यांच्यासोबत संवाद साधणार आहेत.

Leave a Comment