अमेरिकी संसदेतील पहिली हिंदू सदस्य असल्याचा अभिमान – तुलसी गॅबार्ड

Tulsi-Gabbard
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केलेल्या तुलसी गॅबार्ड यांनी आपल्या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकी संसदेतील पहिली हिंदू सदस्य असल्याचा अभिमान आहे, असे गॅबार्ड यांनी म्हटले आहे.

गॅबार्ड या हिंदू राष्ट्रवादी असल्याची टीका काही जणांनी केली होती. मात्र आपल्यावर वांशिक द्वेषातून टीका होत असून अमेरिकेवरील आपल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करणे हे दुटप्पीपणाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा दुटप्पीपणा धर्मांधतेतूनच जन्म घेतो आणि गैर-हिंदू नेत्यांना असे प्रश्न केले जात नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

गॅबार्ड यांनी रविवारी ‘रिलिजियस न्यूस सर्विसेज’ या नियतकालिकात एक संपादकीय लिहिले आहे. यात त्यांनी हिंदू राष्ट्रवादी असे त्यांचे वर्णन करणाऱ्यांवर कठोर शब्दांत प्रहार केले आहेत. “उद्या काय मुस्लिम किंवा यहूदी अमेरिकी म्हणणार का, जपानी, लॅटीन अमेरिकी म्हणणार का,” असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

आपण 2020 साली होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातून दावेदार असणार आहोत, असे 37 वर्षीय गॅबार्ड यांनी 11 जानेवारी रोजी म्हटले होते.

“भारताचे लोकशाही पद्धतीने् निवडून आलेले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी भेट ही या आरोपाचा पुरावा म्हणून दाखवण्यात येत आहे. मात्र नअध्यक्ष (बराक) ओबामा, मंत्री (हिलेरी) क्लिंटन, अध्यक्ष (डोनाल्ड) ट्रंप आणि काँग्रेसमधील माझे अनेक सहकारी त्यांना भेटले असून त्यांच्यासोबत काम करत आहेत,” असेही त्यांनी लिहिले आहे.

Leave a Comment