टोटल धमालमधील पहिले धमाल गाणे रिलीज

total-dhamaal
‘टोटल धमाल’ या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवण्यासाठी अभिनेता अजय देवगण दाखल होत असून नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अनेक दिग्गज काम करताना दिसणार आहेत. त्यातील दोन मोठे चेहरे म्हणजे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित. त्याचबरोबर रितेश देशमुख, जावेद जाफरी, अर्शद वारसी, ईशा गुप्ता आणि संजय मिश्रा हे कलाकारदेखील या चित्रपटात हसवण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यात इतर सगळे कलाकार अनिल – माधुरीसमोर फिके पडले आहेत असे म्हटले तर वावग ठरणार नाही.

या चित्रपटात ८० च्या दशकात आलेल्या ‘कर्ज’ या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या ‘पैसा ये पैसा’ हे गाणे नव्याने सादर करण्यात आले आहे. या चित्रपटाचे या अगोदर पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. अनिल कपूर – माधुरी दीक्षित ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १९ वर्षानंतर एकत्र दिसणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment