शिक्षण ५ वी, वय ९५, हुद्दा सीईओ, पगार २५ कोटी

gulati
वरील मुद्दे वाचले तर ही काहीतरी फेक बातमी असावी असा कुणाचाही समज होऊ शकतो. मात्र तसे काही नसून या बातमीतील प्रत्येक बाब अगदी खरी आहे. एमडीएच मसाले बनविणारे ९५ वर्षीय धरमपाल गुलाटी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार दिला गेला असून तो त्यांच्या उद्योग जगतातील मोलाच्या योगदानाबद्दल दिला गेला आहे.

धरमपाल यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे मात्र त्यांना पुस्तकी ज्ञान फार नसले तरी व्यवसाय ज्ञान मात्र अगाध आहे. त्यामुळे त्यांचा सल्ला बडे बडे उद्योजकही घेतात. युरोमीटरने दिलेल्या अहवालानुसार धरमपाल गुलाटी एफएमसीजी सेक्टर मधले सर्वाधिक कमाई असलेले सीइओ आहेत. गतवर्षात त्यांना २५ कोटी रुपये पगार हातात मिळाला आहे.

अर्थात गुलाटी त्यांच्या कमाईतील ९० टक्के रक्कम दान करतात. ते २० शाळा आणि एक हॉस्पिटल चालवितात. विशेष म्हणजे स्वतःच्या उत्पादनाच्या जाहिराती ते स्वतःच करतात. टीवीवर त्यांच्या मसाल्याच्या जाहिराती आपण नेहमी पाहतो. त्यामुळे धरमपाल जगातील सर्वात वयोवृद्ध जाहिरात स्टार म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment