महाराष्ट्रात आम्ही मोठे होतोच आणि राहणार : संजय राऊत

sanjay-raut
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थीतीत मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

भाजपने शिवेसेनेसोबत कोणतीही युतीची चर्चा केली नाही. शिवसेनाचा महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा भाऊ ठरेल आणि आम्हीच दिल्लीचे तख्त हलवणार असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. बैठकीत युतीबाबत चर्चा झालेली नाही, तर उद्धव ठाकरेंसोबत लोकसभा निवडणुकांच्यासंदर्भात चर्चा झाल्याचे राऊतांनी सांगितले. आम्ही येथे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रपोजलची वाट पहात बसलेलो नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपकडून शिवेसेनेला युतीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते मुद्दे मांडायचे यावर बैठकीत चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडणार आहोत. तसेच आयकर उत्पन्न मर्यादा आठ लाखापर्यंत करावी अशी मागणी देखील अधिवेशनात करणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment