मायकल जॅक्सनसारखे दिसण्यासाठी ‘या’ पठ्ठ्याने केल्या तब्बल ११ सर्जरी

michel-jackson
‘किंग ऑफ पॉप’ मायकल जक्सन याच्या निधनानंतरही त्याच्या फॅन्सच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत आहे. त्याचासारखा डान्स करण्याचा प्रयत्न आजही लाखो फॅन्स करत असतात. असे अनेक चाहतेही आहेत, जे त्याच्यासारखे दिसतातही. त्यातील अर्जेंटिनातील लिओ ब्लॅंको हा एक आहे. असे काही २२ वर्षीय लिओने केले आहे की, ज्यामुळे लिओ मायकल जॅक्सनसारख्या कित्येक चेहऱ्यांपेक्षा वेगळा ठरतो. गेल्या ७ वर्षात मायकल जॅक्सनसारखे दिसण्यासाठी लिओने स्वत:वर २१ लाख रूपयांपेक्षाही जास्त रक्कम खर्च केली आहे.

मायकलचा लिओ बालपणापासून मोठा फॅन आहे. त्याने १५ वर्षाचा झाला असतानाच ठरवले होते की, मायकल जॅक्सनसारखे त्याला दिसायचे आहे. त्याने गेल्या ७ वर्षात एक दोन नाही तर तब्बल ११ प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत. तो त्यावर अजूनही थांबला नसून अजूनही त्याला वाटते की, तो स्वत:मध्ये काही बदल करू शकतो.

एका मुलाखती दरम्यान लिओने सांगितले की, गेल्या ७ वर्षात मी प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिकसारख्या प्रक्रियांमध्ये ३० हजार डॉलर एवढा खर्च केला आहे. ही रक्कम भारतीय मुद्रेत २१ लाख २७ हजार एवढी होते. लिओचे मायकल जॅक्सन प्रति असलेले हे वेड पाहून चाहत्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. पण त्याच्या घरचे लोक यामुळे जरा त्रासलेले आहेत. लिओने सर्जरी आणि कॉस्मेटिक प्रोसेसच्या माध्यमातून स्वत:त अनेक बदल केले आहे. तो आता मायकल जॅक्सनचा डुप्लिकेट वाटतो तर आहे. पण त्याला काही बदल करण्याची गरज आहे. यासाठी तो आणखी प्रयत्न करणार आहे.

Leave a Comment