
कर्नाटकातील हुबळी येथे शनिवारी १२३५ सायकलस्वारांनी एकाचवेळी ४ किमी सिंगल लेन ट्रॅकवर सायकलिंग करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये नोंद केली. यापूर्वीचा असा विक्रम बांगलादेशच्या नावावर होता. तेथे ११८६ सायकलस्वारांनी सिंगल लेनवर ३.२ किमी अंतर सायकलवरून कापले होते.
१२३५ सायकलस्वारांनी हुबळीत नोंदविला विक्रम-गिनीज बुक मध्ये नोंद
हुबळी येथे झालेली सायकलस्वारी प्रामुख्याने लोकांना सायकलिंगचे फायदे समजावेत आणि प्रदूषण कमी करण्याबाबत जागृती करावी या उद्देशाने झाली. कर्नाटकबरोबर यात दिल्ली, जम्मू काश्मीर, गोवा आणि महाराष्ट्रातील शहरातूनही सायकलस्वार सामील झाले होते. प्रत्येक सायकलस्वाराने ठराविक अंतर ठेऊन सिंगल लेनवर सर्वाधिक सायकली आणून मागचे रेकॉर्ड मोडून नवा विक्रम केला.
