‘मणिकर्णिका’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड

manikarnika
मागील शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट आला. पहिल्या दिवशी कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने 8.75 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली. आता या चित्रपटाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडेदेखील समोर आले आहेत. पहिल्या दिवशीच्या कमाईच्या तुलनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीच्या आकड्यांमध्ये कमालीची भर पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवशीच चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी माऊथ पब्लीसीटीचा या चित्रपटाला फायदा झाला. दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा हा तब्बल 18.10 कोटीवर पोहोचला आहे. तर तिसऱ्या दिवशी 15.70 कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमावला. चित्रपटाने आतापर्यंत 42.55 कोटींची कमाई केली आहे. हे आकडे आणखी वाढण्याची शक्यता चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी वर्तविली आहे.

कंगनाने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या शर्यतीत बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटानेही पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे. आता दोन्ही चित्रपटांच्या शर्यतीत कोणता चित्रपट बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment