‘सारे जहांसे अच्छा’ मध्ये शाहरुख ऐवजी दिसणार विकी कौशल

vickykaushal
‘सारे जहांसे अच्छा’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका नक्की कोणता अभिनेता साकारणार आहे या विषयी अद्याप संभ्रमाचे वातावरण कायम असून, या चित्रपटामध्ये आधी शाहरुख खान प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात होते.

vickykaushal1आता या विषयी पुन्हा नव्याने वृत्त आले असून, आता या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत शाहरुख खानच्या ऐवजी ‘उरी’ फेम अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. चंद्रावर जाणाऱ्या प्रथम भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे कथानक आहे.

vickykaushal2
अभिनेता शाहरुख खान यांचा काही काळापूर्वी प्रदर्शित झालेला ‘झीरो’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. तर विकी कौशल याच्या उरी चित्रपटाने चांगलेच यश मिळविले असून, विकीने साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी खूपच पसंत केली आहे. म्हणूनच ‘सारे जहांसे अच्छा’ च्या निर्मात्यांचे झुकते माप विकी च्या बाजूला असून, शाहरुखची या चित्रपटातून गच्छंती होण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. मात्र यावर अध्याप कोणतेही अधिकृत वृत्त अद्याप आले नसून, प्रमुख भूमिकेमध्ये नक्की कोण दिसणार याचा खुलासा लवकरच होणे अपेक्षित आहे.

Leave a Comment