रोहित शेट्टीच्या चित्रपटात झळकणार बॉलीवूडचा भाईजान !

salman-khan
यंदा बॉलीवुडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भाईजानचा शिवाय वर्षाअखेर ‘दबंग 3’ हा चित्रपटही चित्रपटगृहांत झळकणार आहे. ‘भारत’चा टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ‘भारत’ आणि ‘दबंग 3’चे शूटींग संपताच सलमान खान रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

रणवीर सिंगसोबत रोहितने पहिल्यांदा काम केले. बॉक्स ऑफिसवर रोहित व रणवीरचा ‘सिम्बा’ सुपरहिट झाल्यानंतर रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी अक्षय कुमारला साईन केले. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहित व अक्षयची जोडी प्रथमच एकत्र काम करत आहेत. रोहितने आता सलमानसोबत हातमिळवणी केली आहे. म्हणजे रोहित शेट्टीच्या चित्रपटात प्रथमच सलमान झळकणार आहे. विशेष म्हणजे रोहित व सलमानचा हा आगामी चित्रपट एक कॉप ड्रामा आहे. या चित्रपटातही नेहमीप्रमाणे धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्स असणार आहेत.

हा चित्रपट सलमानचा खास मित्र साजिद नाडियाडवाला प्रोड्यूस करत आहे. साजिद या चित्रपटाच्या स्टोरीवर गेल्या अनेक दिवसांपासून काम करत होता. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी साजिद आणि रोहित या दोघांनाही सलमानच हवा होता. अखेर तो योग जुळून आला. ‘किक’ या चित्रपटातील देवी लाल सिंह अर्थात डेव्हिल हे पात्र चित्रपटाअखेर पोलिस वर्दीत दिसतो. साजिद व रोहित आपल्या नव्या चित्रपटाची कथा याच पात्राशी जोडू इच्छितात. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल आणि २०२० च्या अखेरिस तो रिलीज होईल, असे वृत्त आहे.

Leave a Comment