सर्वसाधारण आपण मालवाहू किंवा जड वाहनांवर पुरूष ड्रायव्हर पाहिले असतील. पण वडिलांसाठी ट्रक ड्राइव्हर होण्याचा निर्णय जपानमधील एका २१ वर्षीय तरूणीने घेतला. त्या तरूणीचे नाव राइनो सासाकी असे असून सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहे. सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. अनेकांना कामाचे राइनोच्या कौतुक वाटते की, ऐवढी सुंदर तरूणी ट्रक चालवते.
जपानची ही सुंदर तरुणी वडिलांना आधार देण्यासाठी करत आहे ड्रायव्हिंग
राइनोचे वडील व्यावसायाने ट्रक ड्रायव्हर असून राइनो जेव्हा सात वर्षांची होती तिच्या वडिलांना तेव्हापासून एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. पण राइनोच्या वडिलांकडे पोटाची खळगी भरण्यासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे ते ट्रक चालवायचे. राइनोही वयाच्या सातव्या वर्षांपासून वडिलांसोबत जायची.
बाप आणि मुलगी घरापासून शेकडो किलोमीटर दूर रस्त्यावर एकमेकांना आधार ठरत होते. मोठे झाल्यानंतर राइनोने नृत्य शिक्षक म्हणून काम सुरू केले. राइनोला २१ वर्षाची झाल्यानंतर वाहन चालक परवाना मिळाला. तिने त्यानंतर वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. नृत्य शिक्षकाचे काम सोडून राइनोने ट्रक चालवण्यास सुरूवात केली. राइनो सुरूवातीला ट्रकही चालवायची आणि नृत्य शिक्षक म्हणून काम पहायची. पण राइनो सध्या पूर्णवेळ ट्रक ड्राव्हर आहे आणि राइनोला याचा कोणताही पश्चाताप नाही. मला ट्रक चालवण्यामुळे माझ्या वडिलांसोबत जास्तीत वेळ घालवता येतो, असे तिचे मत आहे.
राइनो जपानमधील फळ-भाज्या घेऊन जाणाऱ्या ट्रकवर ड्राइव्हर आहे. ती वर्षाला साधारणपणे २००,००० किलोमीटर ट्रक चालवते. त्याचबरोबर कधी ट्रकमध्ये काही बिघाड झाल्यास ती स्वत; दुरूस्तीही करते. राइनोची सोशल मीडियावर सतत चर्चा असते. राइनोला सोशल मीडियात लोक जपानची सर्वात सुंदर ट्रक ड्रायव्हर म्हणतात. मला मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे जपानमधील इतरही महिलांना ट्रक ड्रायव्हिंग करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे तिचे मत आहे.