विराटच्या अनुपस्थितीत अखेरच्या दोन सामन्यात शुभमनला संधी

shubhman-gil
नवी दिल्ली – कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यानंतर बोलताना युवा खेळाडू शुभमन गिलला चौथ्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळण्याचे संकेत दिले आहेत. विराट कोहलीला अखेरच्या दोन सामन्यात आराम देण्यात आला असून कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे दिली आहे. विराट कोहली तिसऱ्या सामन्यानंतर बोलताना म्हणाला की, भारतीय संघाने पहिल्या तीन सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला आहे. भारत अखेरच्या दोन सामन्यातही विजय मिळवेल. ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडविरोधात मिळवलेल्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. सलग दोन मालिका विजयामुळे मी आनंदी आहे.

विराट कोहलीने यावेळी अप्रत्यक्षपणे शुभमन गिलला आपला पर्याय असल्याचे सांगितले. कोणीतरी तुमची जागा घेईलच, खेळांमध्ये हे चालतेच. शुभमन गिल प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याला नेट्समध्ये सराव करताना मी पाहिले आहे. शुभमनच्या फलंदाजीने मी प्रभावित झालो आहे. मी ज्यावेळी १९ वर्षाच्या होतो तेव्हा त्याच्या १० टक्केही फलंदाजी करू शकत नव्हतो.

भरपूर आत्मविश्वासची गरज न्यूझीलंडसारख्या दर्जेदार संघाविरोधात खेळण्यासाठी असते. बलाढ्य संघाविरोधात तीन सामने जिंकले हे आपले मोठे यश आहे. भारतीय संघाची गोलंदाजी पाहण्यासारखी होती. अचूक टप्प्यावर शमी आणि भूवनेश्वर कुमारने गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला सुरूवातीलाच धक्के दिले. आपली भूमिका हार्दिक पांड्यानेही चोख बजावली. हार्दिक पांड्याच्या समावेशामुळे संघात समतोल राहतो. संघातील प्रत्येक खेळाडू आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावत आहे आणि हे पाहून मी खूश आहे.

Leave a Comment