कुंभमेळ्यात स्नान करून कामाला लागणार प्रियांका गांधी

kumbhsnan
प्रियांका गांधी यांच्याकडे कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सोपविली गेली असून या कामाची सुरवात त्या प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात स्नान करून करणार आहेत असे समजते. गेल्या काही निवडणुकात कॉंग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घेतला आहे. प्रियांका यांचे कुंभ स्नान त्याचाच एक भाग मानले जात आहे.

प्रियांका आणि राहुल गांधी ४ किंवा ५ फेब्रुवारीला प्रयागराज येथे पवित्र स्नानासाठी येतील असे समजते. ४ तारखेला मौनी अमावास्या असून याच दिवशी दुसरे शाही स्नान आहे. या नंतर प्रियांका आणि राहुल लखनौ येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ४ किंवा ५ तारखेला काही कारणाने हा कार्यक्रम होऊ शकला नाही तर १० फेब्रुवारीला प्रियांका आणि राहुल कुंभ स्नान करतील. हा दिवसही चांगला आहे आणि त्यादिवशी तिसरे शाही स्नान आहे. प्रियांका आणि राहुल प्रथमच कुंभ मेळ्यात स्नान करणार आहेत. गुजरात निवडणुकांच्यावेळी राहुल यांनी अनेक मंदिरात पूजा केल्या होती.

sonia
२००१ साली सोनिया गांधी यांनीही कुंभ स्नान केले होते असेही समजते.

Leave a Comment