बहारीनमध्ये समुद्रतळाशी बनतेय थीम पार्क

baharin
बहारीन मध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांनी नवी युक्ती काढली असून समुद्रतळाशी १ लाख चौरस मीटर परिसरात एक थीम पार्क तयार केले जात आहे. विशेष म्हणजे यात एक बोईंग ७४७ विमान समुद्रात बुडविले जाणार आहे. विमानाच्या माध्यमातून पाणबुडे, सागरी संशोधक यांचा राबता वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या पार्कमध्ये जाण्यासठी तयार केल्या जात असलेल्या डायव्हिंग साईटवर बहारीन मधील मोत्याचा व्यापार केला जाणार आहे. पार्क मध्ये कृत्रिम कोरल्स खडक तयार केले जाणार आहेत आणि एक कला प्रदर्शन भरविले जाणार आहे. या वर्षीच्या उन्हाळ्यात हे पार्क पर्यटकांसाठी खुले करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे समजते.

पर्यावरणवाद्यांनी समुद्रात बुडविलेले विमान गंजेल आणि त्यामुळे समुद्री जीवनाला धोका निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली आहे. मात्र बहारीन सरकारने हे विमान खास काळजी घेऊन बुडविले जाईल, त्यातील ज्या पार्टमुळे समुद्री जिवांना धोका आहे ते पार्ट काढले जाणार असून विमानाला गंज लागू नये म्हणून इकोफ्रेंडली पद्धतीने ते स्वच्छ केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

१९९३ मध्ये अमेरिकेतील मियामी बीचवर असेच बोईंग समुद्रात बुडविले गेले होते मात्र १९९५ च्या गोर्डन वादळात ते नष्ट झाले होते. ब्रिटन, तुर्कस्थानमध्येही अश्या अंडरवॉटर साईट आहेत.

Leave a Comment