चीनच्या गुआंग्डोंग विमानतळावर ५ जी सेवा सुरु

airport5g
जगातील पहिले ५ जी नेटवर्क सुरु करण्यात चीनने बाजी मारली असून द.चीन मधील गुआंग्डोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५ जी बेस स्टेशन सुरु झाले आहे. जगभरात दीर्घकाळा ५ जी नेटवर्कची प्रतीक्षा केली जात असून हे सेवा सुरु करून चीनने जगातले पहिले ५ जी नेटवर्क सुरु करण्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. चीनच्या सरकारी वृतपत्र शिन्हुआ मध्ये या संदर्भात बातमी दिली गेली आहे.

फोर जीच्या तुलनेत ५ जीचा स्पीड ५० पट अधिक असून गुआंग्डोंग विमानतळावरचे बेस स्टेशन युनिकॉमच्या गुआंग्डोंग शाखेने केले आहे. गुआंग्डोंग बायून हा द. चीनमधील प्रमुख विमानतळ आहे. ५ जी नेटवर्क मुळे तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होणार असून हे बेस स्टेशन निर्माण करण्यासाठी हुआईच्या लँप साईटचा वापर केल्याचे समजते. ५ जी हे पाचव्या जनरेशनचे नेटवर्क असून यामुळे एकाचवेळी अनेक डिव्हायसेस इंटरनेटला जोडणे शक्य होते.

Leave a Comment