प्रचंड लोकप्रियता मिळविलेले, युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘हे’ हॉलीवूड चित्रपट

war
अलीकडेच प्रदर्शित झालेला, युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘उरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर खूपच यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाप्रमाणेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित अनेक हॉलीवूड चित्रपटांनी केवळ हॉलीवूडमधेच नाही, तर भारतासमवेत इतर अनेक देशांमध्ये प्रचंड यश मिळविले. यातील काही चित्रपटांच्या विषयी जाणून घेऊ या. २०१७ साली क्रिस्टोफर नोलेनचा ‘डनकर्क’ हा चित्रपट खूपच यशस्वी ठरला. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळामध्ये विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे प्रधानमंत्री असताना डनकर्क येथे घडलेल्या एका असामान्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. डनकर्क जवळ युद्धाच्या काळामध्ये जर्मन फौजांच्या तावडीत अडकलेल्या ब्रिटीश आणि फ्रेंच सैनिकांची सुटका कशा प्रकारे ‘ऑपरेशन डायनॅमो’ अंतर्गत केली गेली, या घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. टॉम हार्डी आणि सिलीयन मर्फी यांनी या चित्रपटामध्ये केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या.
war2
‘झीरो डार्क थर्टी’ हा अमेरिकेमध्ये २०११ साली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यांवर आणि याच्याशी निगडित घटनांवर आधरित चित्रपट आहे. हे हल्ले होऊन गेल्यानंतरच्या दहा वर्षांच्या काळामध्ये ओसामा बिन लादेनचे आयुष्य कसे होते याचे ही वर्णन या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे. तसेच ओसामा बिन लादेनच्या घरावर हल्ला करून ओसामाला यमसदनी धाडल्याच्या घटनेचेही या चित्रपटामध्ये वर्णन आहे. आतंकवादाच्या विरोधात पुकारल्या गेलेल्या संघर्षावर आधारित हा चित्रपट आहे.
war1
२०१६ साली प्रदर्शित झालेली मेल गिब्सन दिग्दर्शित ‘हॅक सॉ रिज’ चित्रपटाची कथा एका सैनिकावर आधारित आहे. हा सैनिक मनाने अतिशय धार्मिक स्वभावाचा असून, कोणत्याही मनुष्याचा कोणत्याही कारणास्तव प्राण घेण्याला आक्षेप असणारा असा हा सैनिक आहे. त्यामुळे कोणावरही शस्त्र न चालविता आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या या सैनिकाची ही कथा आहे. या चित्रपटानेही मोठे यश मिळविले.

Leave a Comment