
जर ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सारखी सौंदर्यवती अभिनेत्री भारतामधेच नाही, तर पाकिस्तानमध्ये ही आहे. हुबेहूब प्रियांका चोप्रा सारखी दिसणारी झलाय सरहदी ही तरुणी पाकिस्तानमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. इंटरनेटवर या तरुणीची छायाचित्रे नुकतीच प्रसिद्ध झाली असून, तिच्यातील आणि प्रियांका चोप्रातील साम्य कोणाच्याच नजरेतून सुटलेले नाही.
‘ही’ आहे पाकिस्तानातील ‘प्रियांका चोप्रा’
सरहदीची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, या दोघींच्या चेहऱ्यामध्ये असणाऱ्या साम्याने नेटकरी अचंबित झाले आहेत. त्यामुळेच सरहदीला सध्या पाकिस्तानची ‘प्रियांका चोप्रा’ म्हणून प्रसिद्धी मिळत असून, तिला प्रियांकाच्या ‘बॉडी डबल’ची भूमिका करण्याबद्दलही विचारण्यात आले असल्याचे वृत्त आहे. भारतातील एका चित्रपट निर्मात्याने सरहदीला प्रियांकाची ‘बॉडीडबल’ म्हणून काम करण्याबद्दल विचारणा केली होती. पण हा प्रस्ताव सरहदीला आवडला नसून, तिने प्रियांकाची बॉडी डबल म्हणून काम करण्यास साफ नकार दिला असल्याचे समजते.
