‘अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय’ – हेमा मालिनींंच्या नृत्य नाटिकेचे सुषमा स्वराज यांनी असे केले वर्णन

Hema-Malini2
‘अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय’ अश्या शब्दांमध्ये सुषमा स्वराज यांनी हेमा मालिनींच्या नृत्य नाटिकेचे वर्णन केले आहे. वाराणसी येथे आयोजित प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या निमित्ताने आयोजित समारंभामध्ये हेमा मालिनी यांनी ही नृत्य नाटिका सादर केली होती. या नृत्य नाटिकेमध्ये हेमा मालिनी यांनी गंगा नदीची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमाला भारतातील आणि परदेशातील अनेक नामवंत व्यक्ती पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Hema-Malini
हेमा मालिनी यांनी सादर केलेली नृत्य नाटिका ‘माँ गंगा’ नव्वद मिनिटांची असून, हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानली गेलेली गंगा नदी आता किती प्रदूषित होत आहे हे दर्शविणारी ही नृत्य नाटिका होती. यामध्ये हेमा मालिनी यांनी गंगा नदीची भूमिका साकारली असून, त्यांच्या या भूमिकेला उपस्थित पाहुण्यांचे खूप कौतुक लाभले. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनीही हेमा मालिनी यांच्या भूमिकेचे कौतुक केले असून, हेमा मालिनी यांची ही नृत्य नाटिका अद्भुत, अकल्पनीय आणि मनाला भुरळ घालणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Hema-Malini1
या नृत्यनाटिकेचे संगीत असित देसाई यांचे असून, या नाटिकेतील गीते सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन आणि मिका सिंह यांनी गायली आहेत. या नाटिकेसाठी कॉस्च्युम्स नीता लुल्ला यांनी डिझाईन केले होते. या संमेलनाचे उद्घाटन पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले असून, समारोप समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment