भारताची किवींवर मात, मालिकेत 2-0 ने आघाडी

c
माऊंट माऊंगानुई  – न्यूझीलंड दौऱ्यातील वन डे मालिकेत दुसऱ्या सामन्यात भारताने किवी संघाचा 90 धावांनी पराभव केला. भारताने न्यूझीलंडसमोर 325 धावांचे आव्हान ठेवले होते.

या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या किवींना मात्र ५० षटकंही पूर्ण करत्या आल्या नाही. ४० षटकांमध्येच किवींचा सगळा संघ तंबूत परतला. कुलदीप यादवने या सामन्यात ४५ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या आणि भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. कुलदीप यादव-मोहम्मद शामीने १-१ विकेट घेतली तर यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारने २-२ विकेट्स घेतल्या. सरतेशेवटी २३४ धावांत न्यूझीलंडचा संघ गारद झाला.

भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकी खेळी करत चांगली सुरुवात करून दिली. कोहली आणि रायुडूनेही चांगली फलंदाजी केली. त्यानंतर शेवटी महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी जोरदार फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 324 पर्यंत पोहोचवली. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताने आता 2-0 ची आघाडी घेतली आहे.

Leave a Comment