फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठवता येणार

app
मुंबई : फेसबूक कंपनी नवनवीन फिचर आणत असते. आता फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार,  ही कल्पना मार्क झुकेरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत.

ही मॅसेज पाठिवण्याची प्रक्रिया एंड टू एंड एनक्रिप्टेड म्हणजे सुरक्षितच असणार आहे. ही प्रणाली आजही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वापरली जाते, ज्यामुळे व्हॉट्सअॅपवरील मॅसेज कोणीही हॅक करू शकत नाही. फेसबुकचे युजर्स कमी होऊ लागले आहे. त्यामुळे युजर्सची संख्या वाढवावी यासाठी मार्कने ही शक्कल लढवली आहे. फेसबुकने ही सुविधा कधी सुरु करणार हे अद्याप सांगितले नाही.

Leave a Comment