बंगळुरुतील हे डॉक्टर गरीब रुग्णांवर करणार ‘मोफत न्जिओप्लास्टी’

ngoplasty
बंगळुरू – गरीब रुग्णांवर मोफत अॅन्जिओप्लास्टी करणार असल्याची घोषणा येथील सेंट. जॉन्स हॉस्पीटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. किरोन व्हर्गेसे यांनी केली आहे. ही मोफत शस्त्रक्रिया दररोज एक याप्रमाणे 30 रुग्णांवर करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयात गरिब रुग्णांसाठी खर्चिक असलेली ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.
ngoplasty1
खासगी रुग्णालयात जाऊन जे रुग्ण उत्तम शस्त्रक्रिया घेऊ शकत नाहीत, ज्यांची आर्थिक स्थिती गरीब आहे, अशा रुग्णांवर मला मोफत उपचार करायचे आहेत, असे किरन व्हर्गेस यांनी म्हटले आहे. व्हर्गेसे हे एकूण 30 एन्जिओप्लासाटी शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यासाठी काही मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी पैशांची मदत केली आहे. ही शस्त्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत मोफत करण्यात येणार आहे. या मोफत शस्त्रक्रिया शिबिराची सुरुवात जानेवारी महिन्यातील 15 तारखेला करण्यात आली आहे. त्यासाठी रुग्णांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
doctor1
या शस्त्रक्रियेसाठी तरुण रुग्ण आणि कुटुंबातील कमावत्या व्यक्तीस प्राधान्य मिळणार आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयात 1-2 लाख रुपयांचा सध्या अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रियेसाठी खर्च होतो. तर जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार सध्या जगभरात ह्रदयरोगाशी संबंधित आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर वयवर्षे 40 ते 60 वर्षांच्या व्यक्तींवर अधिक प्रमाणात ही शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

Leave a Comment