काँग्रेसचे नते भुपेंद्रसिंह हुड्डा यांच्या निवासस्थानावर सीबीआयचा छापा

bhupinder-singh-hood
चंदिगढ : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नते भुपेंद्रसिंह हुड्डा यांच्या निवासस्थानावर सीबीआयने छापा मारला आहे. हुड्डांचा मतदार जींद हा संघ असून ते याच मतदारसंघातून लोकसभेसाठी उभे राहणार आहेत. जींदमध्ये त्यांनी त्याच तयारीचा भाग म्हणून जाहीर सभेचे आयोजन केले होते. ही सभा शुक्रवारी दुपारी होती. सीबीआयच्या पथकाने त्या आधीच सकाळी हुड्डांच्या निवासस्थानी छापे घातले. या छाप्यांचे नेमके कारण काय आहे हे सुरूवातीला कळत नव्हते. नंतर दिल्ली आणि नोएडामध्येही सीबीआयने 30 ठिकाणी छापे घातल्याची बातमी आली.

हुड्डा यांच्यावर मानेसर येथे 912 एकर जमीन वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप होता. सीबीआयनेही त्याच प्रकरणी कारवाई केली असे स्पष्ट झाले. भुपेंद्रसिंह हुड्डा आणि त्यांचे पुत्र दिपेंद्रसिंह हेही ही कारवाई सुरू असताना निवासस्थानी उपस्थित होते. रोहतक येथील डी-पार्क येथे हुड्डा यांचे घर आहे. या कारवाईवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

Leave a Comment