राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत – एच.डी. कुमारस्वामी

Rahul-Gandh
नवी दिल्ली – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान कोण होणार यावर मोठे वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुमारस्वामी म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे अशी आमच्या पक्षाची ईच्छा आहे. त्यासाठी आमचा पक्ष रात्र-दिवस काम करत आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच कुमारस्वामी यांनी ममता बनर्जी पंतप्रधान बनण्यासाठी सक्षम आहेत असे म्हणाले होते. यावर्षी लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एनडीएला पराभूत करण्याचा आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरुन हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे.

काही दिवसांपूर्वी, कोलकातामध्ये विरोधी पक्षाच्या रॅलीमध्ये पश्चिम बंगालचे मुख्‍यमंत्री यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली हल्ला करीत होते. त्यांनी म्हटले होते की, ‘मोदी सरकारची ‘एक्सपायरी डेट’ संपली आहे. भाजप सोबत जे पक्ष नाहीत त्यांना चोर म्हटले जात आहे. आमचा पक्ष एकत्र मिळून काम करतो. पंतप्रधान कोण असतील यावर निर्णय लोकसभा निवडणुकीनंतर होईल.’

Leave a Comment