भारतातील ‘या’ शहरात होणार ‘आयफोन’ची निर्मिती

apple
नवी दिल्ली – लवकरच आपले नवे आयफोन XS, XS Max आणि XR ला अमेरिकेची कंपनी अॅपल भारतात मॅन्युफॅक्चर करण्याची शक्यता आहे. याचे कारण आता चायनाच्या प्लांटवर कंपनी अवलंबून राहू इच्छित नसल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात स्मार्टफोन्सची कंपनी निर्मिती करणार ज्यामुळे आयफोनच्या किमतींमध्ये घट करता येणे शक्य होणार आहे. फोनचे दर कमी झाल्याने आयफोनच्या विक्रीमध्येही वाढ होऊन कंपनीला फायदा होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. अॅपल सप्लायर फॉक्सकॉनने सांगितले आहे, की लवकरच भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिटची कंपनी प्लानिंग करणार आहे. असेही सांगण्यात येत आहे, की चायनाच्या मॅन्युफॅक्चरिंग बेसला शिफ्ट करण्याचे प्लानिंग देखील कंपनी करत आहे. एका रिपोर्टनुसार फॉक्सकॉनचे वरिष्ठ अधिकारी आणि चेअरमन टेरी गौ लवकरच भारतात येऊन यासंदर्भात चर्चा करणार आहेत. भारत व्हिस्ट्रॉनद्वारे पूर्वीपासूनच आयफोन 6S आणि आयफोन SE असेम्बल करण्यात येतात. याबाबत काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अॅपलच्या हाय-एन्ड आयफोन व्हिस्ट्रॉनऐवजी फॉक्सकॉनद्वारे बनवण्यात येणार आहेत.

तामिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदूर स्थित आपल्या लोकल असेम्बलिंग युनिट फॉक्सकॉनला मॉडेल्सचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट अॅपल बनवू शकते, अशी चर्चा आहे. अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती, की तायवानची कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर कंपनी लवकरच प्रॉडक्ट्सची असेम्बलिंग सुरू करणार आहे. फॉक्सकॉनच्या विस्ताराने भारतात २५ हजार नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

भारतात आयफोनची मॅन्युफॅक्चरिंग सुरू झाल्याने ग्राहकांना सर्वात जास्त फायदा होणार आहे. आयफोनच्या टॉप एन्ड मॉडल्ससंबंधित बोलायचे झाल्यास भारतात याची किंमत १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. याचे कारण आयफोन बाहेरुन एक्सपोर्ट करण्यात येतात त्यामुळे त्यांची किंमत जास्त असते. आयफोनची असेम्बलिंग भारतात झाल्याने किमतीत घट होऊ शकते. दुसरीकडे चायनाच्या प्रमुख स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी भारतातच असेम्बलिंग युनिट लावले आहेत. यामुळे चायनाच्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स भारतात कमी किमतीत उपलब्ध होत आहेत.

Leave a Comment