इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे ब्रेक्झिटमुळे होणार नाही नुकसान

brexit
लंडन – ब्रेक्झिटमुळे इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असे यूनिव्हर्सिटीज युके इंटरनेशनलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती दरम्यान यूनिव्हर्सिटीज युके इंटरनेशनलच्या संचालक व्ही. व्ही. एन. स्टर्न या म्हणाल्या, ब्रेक्झिटनंतर आपल्या मुलांच्या लंडनमधील शिक्षणासंदर्भात भारतीय माता-पितांना चिंतित होण्याची गरज नाही. मलेशिया, सिंगापूर आणि चीनशिवाय भारतालाही नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहे.

स्टर्न म्हणाल्या, इंग्लंड युरोपीय संघातून विभक्त होण्याच्या भीतीबरोबरच पाऊंडदेखील कमकुवत होण्याची शक्यता आहे. इंग्लंडने युरोपीय संघातून वेगळे होण्यासाठी मतदान घेतल्यानंतरही पाऊंड घसरला होता. इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरेल. यूनिव्हर्सिटीज युके इंटरनेशनल इंग्लंडमधील विद्यापीठांचे संघटन आहे. यात इंग्लंडमधील १३६ विद्यापीठांचा समावेश आहे.

Leave a Comment