‘शोभा डें’चा विरोध बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला

shobha-de
मुंबई – लेखिका शोभा डे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध दर्शविणारे ट्विट केले आहे. अशी स्मारके कुणाला हवी आहेत, आम्हाला तर रुग्णालये आणि शाळा पाहिजेत, असे म्हणत शोभा डे यांनी सर्वच स्मारकाला आपला विरोध दर्शवला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रस्तावित स्मारकाच्या गणेशपूजन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर, डे यांनी हे ट्विट केले आहे.

आपल्या ट्विटमुळे किंवा वादग्रस्त कमेंटमुळे लेखिका शोभा डे नेहमीच चर्चेत असतात. डे यांनी आताही 100 कोटींच्या स्मारकाबद्दल ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मला एक नागरिक म्हणून 100 कोटी रुपये खर्च करण्याचा अधिकार द्या. मग, पाहा मी कशाप्रकारे या 100 कोटी रुपयांची गुंतवणूक लोकांच्या कल्याणासाठी करते, असे डे यांनी म्हटले आहे. तसेच अशी स्मारके कुणाला हवी आहेत? आम्हाला तर शाळा आणि रुग्णालये पाहिजेत, असे ट्विट शोभा डे यांनी केले आहे. शिवसैनिकांमध्ये डे यांच्या टि्वटमुळे रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment