जॉनच्या ‘रोमियो अकबर वाल्टर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज

john-abraham
बॉलिवूडचा मॅचोमॅन अर्थात अभिनेता जॉन अब्राहम हा आगामी ‘रोमियो अकबर वाल्टर’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. जॉनचा अनोखा लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे.

जॉनचा भुवया उंचावून तोंडात सिगरेट घेतलेला हा अवतार हटके दिसत आहे. त्याला याआधी या अंदाजात कधी पाहिले नव्हते. त्याचबरोबर पोस्टरच्या मागे जॉन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. यावरुन चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच शिगेला पोहोचली असेल.


जॉनने आपल्या ट्विटर अकांऊटवर या चित्रपटाच्या पोस्टरला शेअर केले आहे. तसेच ‘एक माणूस, खूप चेहरे. एक मिशन-आपल्या देशाची सुरक्षा. #RAW चे रोमियो प्रेजेंट करत आहे. देशभक्तांच्या खऱ्या घटनेवर आधारित’, असे कॅप्शन त्याने दिले आहे. १२ एप्रिल २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. जॉनशिवाय चित्रपटात मौनी रॉय, जॅकी श्रॉफ, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि सिकंदर खेर यांची महत्त्वाची भूमिका आहे.

Leave a Comment