टीम इंडियाच्या ‘गब्बर’ने केली ब्रायन लाराच्या पराक्रमाशी बरोबरी

shikhar-dhawan
नेपिअर – काल खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. शिखर धवनने सामन्यात न्यूझीलंडच्या १५७ धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी करताना ७५ धावांची खेळी केली. त्याने या खेळीबरोबरच ब्रायन लाराच्या पराक्रमाशी बरोबरी केली आहे.

शिखर धवनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ५ हजार धावा पूर्ण केल्या. ११८ डावांत शिखर धवनने ५ हजार धावा केल्या. शिखरने याबरोबरच विंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराच्या पराक्रमाची बरोबरी केली आहे. ब्रायन लारानेही ११८ डावांत ५ हजार धावा केल्या होत्या. याबरोबर शिखरने भारतीय फलंदाजांत सर्वात वेगवान ५ हजार धावा करण्याच्या बाबतीत दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत पहिल्या स्थानावर ११४ डावांसह विराट कोहली आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाच्या नावावर एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान ५ हजार धावा करण्याचा विक्रम आहे. केवळ १०१ डावात त्याने ५ हजार धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि व्हिवियन रिचर्डस ११४ डावांसह दुस-या क्रमांकावर आहेत. तिस-या क्रमांकावर ब्रायन लारा आणि शिखर धवन तर चौथ्या क्रमांकावर ११९ डावांसह केन विलियमसन याचा नंबर लागतो.

Leave a Comment