क्रिती-कार्तिकच्या ‘लुका छुपी’चे दोन नवे पोस्टर रिलीज

luka-chupi
कार्तिक आर्यन ‘सोनू की टिटू की स्वीटी’ या चित्रपटानंतर आणखी एका राँमेटिंक-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. तो अभिनेत्री क्रिती सेननसोबत ‘लुका छुपी’ चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील दोन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत.


हे पोस्टर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. क्रिती-कार्तिक रोमँटिक मूडमध्ये यात दिसत आहेत. तर दोघांच्याही गळ्यात वरमाला दिसत आहेत. या पोस्टरमध्ये अपारशक्ती खुराणा आणि पंकज त्रिपाठी यांची सुद्धा झलक या दोघांबरोबरच पाहायला मिळत आहे.


नव्या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखदेखील घोषित करण्यात आली आहे. ‘लुका छुपी’ चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर करत असून निर्माते दिनेश विजन आहे. यामध्ये कार्तिक एका स्थानिक न्यूज चॅनलच्या स्टार रिपोर्टरची भूमिका साकारणार आहे. एका छोट्या शहरातील लव्ह स्टोरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. १ मार्च २०१९ ला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment