प्रियांकाने तिच्या कुत्रीसाठी घेतले ३५ हजाराचे जॅकेट

jacket
बॉलीवूड अभिनेत्री आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या विवाहाच्या चर्चा रसिक अजूनही करत असतानाचा प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण मात्र थोडे वेगळे आहे. प्रियांकाने तिच्या पाळीव कुत्रीसाठी म्हणजे डायना साठी ३५ हजाराचे जॅकेट डिझायनर कडून बनवून घेतले आहे. या जॅकेटमधील डायनाचे फोटो प्रियांकाने शेअर केले आहेत.

पफर जॅकेट घातलेल्या डायनाच्या फोटोखाली प्रियांकाने लिहिते, लॉस एंजेलिस मध्ये खूप थंडी आहे. डायनासाठी हे खास आउटफीट बनविल्याबद्दल डिझायनर मोन्कबरला धन्यवाद. प्रियांका आंतरराष्ट्रीय स्टार बनल्यापासून डायना ही लाईमलाईट मध्ये आली आहे. डायनाचे इन्स्टाग्राम अकौंट असून त्यावर तिचे ९५ हजार फॉलोअर्स आहेत.

Leave a Comment