मेझू झिरो – जगातला पहिला सिल्ड स्मार्टफोन

meizu
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी मेझूने जगातील पाहिला सिल्ड म्हणजे एकही होल नसलेला स्मार्टफोन मेझू झिरो नावाने लाँच केला आहे. या फोनला स्पीकरसाठी, चार्जिंग साठी एकही पोर्ट नाही इतकेच नव्हे तर सिमकार्ड स्लॉट सुद्धा नाही.

या फोनला ५.९९ इंची फुल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले २.५ कर्व्हड ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. रिअरला ड्युअल कॅमेरा सेटअप असून त्यात १२ एमपीचा एक आणि २० एमपी टेलीफोटो लेन्ससह दुसरा कॅमेरा आहे. फ्रंटला २० एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. हा अँड्राईड फोन फेस अनलॉक फिचरसह आहे.

हा फोन वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. पॉवर आणि व्हॉल्यूम बटण साईडच्या खास टच पॅनल मध्ये रिप्लेस केले गेले आहे. स्पीकरसाठी डिस्प्लेमध्ये ऑप्शन दिले गेले आहे. या फोनच्या किमतीचा खुलासा झालेला नाही.

Leave a Comment