यंदाचा प्रजासत्ताक दिन या कारणांनी वेगळा

republic
दरवर्षी २६ जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये यंदा प्रथमच काही नवीन दिसणार असून त्यामुळे हा दिवस विशेष ठरणार आहे. दरवर्षी या परेडमध्ये लष्कराची शस्त्रे, अस्त्रे नागरिकांना पाहायला मिळतात त्यात यंदा नवी भर पडणार आहे.

या प्रजासत्तक दिनाला प्रथमच महिला निमलष्करीदल परेड मध्ये सहभागी होत आहे तसेच पुरुष लष्करी दलाचे नेतृत्व महिला अधिकारी करणार आहे. बोफोर्स नंतर ३० वर्षांनी प्रथमच आर्मीच्या नव्या आर्टलरी चे दर्शन होणार असून त्यात एम ७७७ व के ९ वज्र पाहायला मिळणार आहेत. के ९ वज्र एल अँड टी आणि मेक इन इंडिया अंतर्गत तयार केले गेले असून हि कोरियाई आर्टिलरी गन आहे तर एम ७७७ हि १५५ एमएमची आर्टिलरी गन असून तिची रेंज ३० किमी आहे. अफगाणिस्थान युद्धात त्याचा वापर केला गेला होता.

मेजर जनरल पुनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार डीआरडीओ चे दोन डिफेन्स प्रोजेक्ट सरफेस तो एअर मिसाईल आणि अर्जुन आर्म्ड रिकव्हरी व रिपेअर व्हेईकल परेड मध्ये प्रथमच दिसणार आहेत. तसेच सरफेस माईन क्लिअरिंग म्हणजे भूसुरुंग साफ करणारे वाहन प्रथम पाहायला मिळणार आहे. यंद राजपथावरील फ्लायपास्ट मध्ये ३२ ट्रान्सपोर्ट विमाने बायो फ्युअलवर उड्डाण करणार आहेत.

सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत सहभागी असलेले चार सैनिक प्रथमच परेड मध्ये सहभागी होणार आहेत.

Leave a Comment