मत्स्यकन्या बनून तुमच्या भेटीला येत आहे सनी लिओन

sunny-leone
आगामी चित्रपटातील एका खास गाण्यात अभिनेत्री सनी लिओन मत्स्यकन्येच्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सनी लिओन ऋषी कपूर, सनी सिंग आणि ओमकार कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘झूठा कहीं का’ या चित्रपटातील एका गाण्यात झळकणार आहे.

थायलंडमध्ये या खास गाण्याचे शूटिंग करण्यात आले आहे. हे गाणे सनी आणि ओमकार यांच्यावर चित्रीत करण्यात आले असून हे गाणे हनी सिंगने गायले आहे. या गाण्यात हनी सिंगने प्रसिद्ध बडबडगीत ‘मछली जल की रानी है’ या ओळींचाही समावेश केला आहे. गाण्याच्या बोलानुसार यामध्ये सनी मत्स्यकन्येच्या रुपात दिसणार असून तिच्यासाठी खास तसे कपडे तयार करण्यात आले आहेत.

लोकांच्या पसंतीस हनी सिंगची प्रत्येक गाणी उतरतात. चाहत्यांना हे गाणेसुद्धा आवडेल अशी खात्री आहे. माझ्यासाठी मत्स्यकन्या साकारणे हा एक नवीन अनुभव होता. माझ्या या नव्या लूकविषयी चाहत्यांना काय वाटते हे जाणून घेण्याची मला फार उत्सुकता असल्याची प्रतिक्रिया सनीने दिली. स्मीप कांग ‘झूठा कहीं का’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून जिमी शेरगीलचीही यामध्ये भूमिका आहे. हा चित्रपट ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment