कस्तुरी मृग पाहायला चला नंदादेवी अभयारण्यात

kasturi
चोहोबाजूंनी उंच पहाड, हिरवाई आणि निसर्गसुंदर दृश्ये यांनी परिपूर्ण उत्तराखंड मधील नंदादेवी राष्ट्रीय उद्यान हा एक अनुभवण्याचा विषय आहे. समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचीवर असलेल्या जागी ६३० चौरस किलोमीटर परिसरात हे राष्ट्रीय उद्यान पसरले आहे. जैव विविधतेने नटलेल्या या अभयारण्यात कस्तुरी मृग मोठ्या संखेने पाहायला मिळतात. या हरणांच्या बेंबी मध्ये असलेल्या सुवासिक कस्तुरीला जगभरातून मोठी मागणी आहेच पण आपल्या देशात धार्मिक कार्य आणि अनेक आयुर्वेद औषधात तिचा वापर केला जातो.

tiger
उत्तरखंड मधील हे सर्वात मोठे अभयारण्य आहे. १९३९ साली त्याला अभयारण्याचा दर्जा दिला गेला होता आणि १९८२ मध्ये ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. १९८८ मध्ये युनेस्कोने त्याचा समावेश जागतिक वारसा यादीत केला आहे. या अरण्यात कस्तुरी मृग बरोबरच स्नो लेपर्ड, माकडे, अस्वले, लांडगे असे अनेक वन्य प्राणी पाहायला मिळतात.

bluebird
येथे ११४ प्रकाराचे पक्षी दिसतात आणि ४० प्रकारची फुलपाखरेही. अनेक जातीचे कीटक, ३१२ विविध जातीची फुले अश्या संपत्तीने हे अरण्य संपन्न आहे. नंदादेवी हे हिंदू धर्मियांचे तीर्थस्थळही आहेच. उंच पहाड, खोल दर्या, बर्फाच्छादित शिखरे याने हा परिसर रमणीय बनला आहे.

flowers
येथे जाताना गटाने जावे लागते आणि सोबत गाईड असतो. १४ वर्षाखालील लोकांना येथे प्रवेश नाही. येथील रस्ते लांब, वेडेवाकडे आणि अतिशय दुर्गम आहेत. त्यामुळे आपला फिटनेस चांगला असावा लागतो. १ मे ते ३१ ऑक्टोबर हा येथे जाण्यासाठीचा काल. त्यातही १५ जून ते १५ सप्टेंबर हा काळ सर्वात उत्तम असतो.

Leave a Comment