कर्करोग आणि दुर्मिळ रोगांवरील औषधे होणार स्वस्त

drugs
महत्वाच्या औषधांवरील नफा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कर्करोग आणि इतर दुर्मिळ रोगांवरील 50 हून अधिक औषधांचा व्यापारी नफा निश्चित करणार आहे.

व्यापारी नफा हा औषध विक्रेते आणि घाऊक विक्रेते यांच्याकडून 25-30% दराने घेतले जाते. त्यामुळे औषधांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे औषधांच्या किंमतमध्ये सुट देण्यात आली आहे. अशी अधिकृत माहिती स्रोतांकडून मिळाली आहे.

हा निर्णय उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. या अंतर्गत 50 औषधांची यादी डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेस (डीजीएचएस) ने तयार केली आहे. यात 39 औषधे अशी आहेत जी कर्करोग आणि दुर्मिळ आजारांसाठी वापरली जातात.

पंतप्रधान कार्यालयाने आरोग्य मंत्रालयाला एक यादी तयार करायला सांगितले आहे. ज्यामध्ये कर्करोग आणि इतर दुर्मिळ आजारांचा समावेश होते. या रोगांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होते आणि यांना लागणारी औषधे देखील खूप महाग असतात. त्यामुळे गरिब लोकांना उपचार घेताना आर्थिक अडचणीचा सामाना करावा लागतो.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या औषधांची यादी देण्यात आली असून लवकरच यावर आदेश जारी करण्यात येतील. सरकार ट्रेड मार्जिन म्हणजेच व्यापारांचा नफा ठेवण्याकरिता ‘ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर’ पॅरा 19 चा वापर करणार आहे. ज्या अंतर्गत अपवादात्मक परिस्थितीचे उदाहरण देत नफावर नियंत्रण ठेवण्यात येईल. हे पाऊल उचलण्या मागील कारण म्हणजे कर्करोग आणि अनेक दुर्मिळ रोगांवरील औषधांचा खर्च खूप जास्त आहे आणि निधारीत किंमती पेक्षाही जास्त आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment