
नवी दिल्ली – ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू विक्रमादीत्य सचिन तेंडुलकरने केली आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास अजुन प्रसार होईल असेही सचिन म्हणाला. मला एक क्रिकेटपटू या नात्याने माझा खेळ अजुन मोठ्या स्तरावर पोहचलेला पहायला आवडेल.
ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची सचिन तेंडुलकरची मागणी
मी 2016 साली रिओ ऑलिम्पिकदरम्यान ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षांशी, क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेशाबद्दल बोललो होतो. त्यांना मी सुरुवातीला कसोटी क्रिकेटबद्दल बोलत असल्याचे वाटत होते. पण मी नंतर त्यांना क्रिकेटमध्ये वन-डे, टी-20, टी-10 असे प्रकारही प्रचलित असल्याचे सांगितले. पण क्रिकेटचा भविष्यकाळात ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास, प्रचलित संघाव्यतिरीक्त इतर संघांना तयारीसाठी पूर्ण वेळ मिळणे गरजेचे आहे. क्रिकेटला जोपर्यंत ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेत तोपर्यंत खेळाचे स्वरुप बदललेले असेल, पण क्रिकेट हा खेळ ऑलिम्पिकमध्ये असणे गरजेचे असल्याचे मला वाटते.
