रघुराम राजन यांच्या गुरुनी स्वीकारलाय विजनवास

aloksagar
रिझर्व बँकेचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांचे दिल्ली आयआयटी मधील शिक्षक प्रो. अलोक सागर गेली २९ वर्षे विजनवासात राहत असून त्यांनी वनवासी जीवन स्वीकारले आहे. शाहपूर पासून २५ किमीवर असलेल्या कोचमउ येथे शेतात झोपडी बांधून ते राहत आहेत आणि शेती करत आहेत.

डॉ.अलोक सागर हे आयआयटियन आहेत शिवाय त्यांनी ह्युस्टन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली आहे. ते अनेक भाषांचे जाणकार आहेत. कॅनडा येथे ७ वर्षे नोकरी करून ते भारतात परतले आणि दिल्ली आयआयटी मध्ये अध्यापनाचे काम करत होते. गेली २९ वर्षे त्यांनी वनवासी जीवन स्वीकारले आहे. शेतात १० बाय १० ची झोपडी, कपड्यांचे दोन जोड, थोडी भांडी, एक सायकल आणि पाळीव कुत्री असा त्यांचा प्रपंच आहे.

अलोक सागर सांगतात मोबाईलने माणसाला जखडून टाकले आहे. माणसाचा सरळ स्वभाव राहिला नाही. वनवासी लोकांची जंगले वाचावी आणि त्यांना नोकरीवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी या लोकांच्यात काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांनी शेतात चिकू, जांभूळ, मोह, काजू, सीताफळ, लिंबू, मोसंबी, लीची, अंजीर, रिठा, आवळा, आंबे अशी अनेक प्रकारची झाडे लावली असून या झाडांना ते सायकलवरून नेऊन पाणी देतात. सध्याचे शिक्षण हे नोकर बनविणारे आहे त्यात मेंदूचा वापर करावा लागत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment