तुम्ही ओळखले का या अभिनेत्याला?

r-madhavan
‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट ‘ या चित्रपटात अभिनेता आर. माधवन मुख्य भूमिका साकारत असून तोच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. याचे गेल्या काही दिवसांपासून शूटींग सुरू आहे. त्याचा एक फोटो नुकताच सोशल मीडियामध्ये झळकला आहे. तो यात शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्यासोबत दिसत आहे. दोघांच्याकडे पाहिले तर खरे नंबी नारायण कोण असा प्रश्न पडावा एवढे त्याच्या गेटअपमध्ये साम्य आहे.


वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर ‘रॉकेट्री- द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट आधारित आहे. इस्रोमधील ते वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि अधिकारी होते. १९९४ मध्ये त्यांना अहेरगिरी केल्याच्या खोट्या आरोपाखाली टक करण्यात आली होती. परंतु त्यांच्यावरचे हे सर्व आरोप खोटे ठरले आणि त्यांना निर्दोष ठरवण्यात आले.

माधवन चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला होता, माझ्यासाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. अनंत महादेवनने तीन वर्षापूर्वी नंबी नारायण यांची गोष्ट सांगितली होती. खोट्या आरोपाखाली अन्याय होऊन तुरुंगात गेलेल्या व्यक्तीची ही गोष्ट असावी, असे मला वाटत होते. त्यानंतर मी लिहायाला सुरुवात केली आणि मला स्क्रिप्ट पूर्ण करायला सात महिने लागले. चित्रपटासंबंधी मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी त्यांच्या योगदानाबद्दल बोलले नाही, पण त्यांना मी बोलते करायचा प्रयत्न केला तेव्हा मला लक्षात आले की माझ्या स्क्रिप्टमधून मी अन्याय करत आहे. कारण स्क्रिप्टमध्ये मी केवळ त्यांच्या केसबद्दल लिहिले होते.

मला यासाठी सात महिने लागले होते. ती स्क्रिप्ट मी फेकून दिली आणि अनंत महादेवन आणि इतर लेखकांच्यासोबत दिड वर्षे ही स्क्रिप्ट लिहिली. मला खात्री आहे की, देशातील ९५ टक्के लोकांना नंबी नारायण यांच्याबद्दल माहिती नसणार आणि हा एक गुन्हा आहे, असे मला वाटते. जे पाच टक्के लोक त्यांना ओळखतात त्यांनाही त्यांची पूर्ण गोष्ट माहिती नसणार.

Leave a Comment