मसाझोच्या दीर्घायुष्याचे हे होते रहस्य

masazo
जगातील सर्वाधिक वयाचा अशी नोंद गिनीजबुक मध्ये झालेला जपानी मसाझो नोनान्का यांचे वयाच्या ११३ व्या वर्षी २० जानेवारी २०१९ ला निधन झाले. त्यानंतर त्याच्या दीर्घायुष्यामागे काय रहस्य होते याची चर्चा सुरु झाली तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती मजेदार होती. मसाझोला मृत्यू अतिशय शांततेत आला म्हणजे त्याला कोणताही आजार नव्हता. रात्री तो झोपला तो पुन्हा जागा झाला नाही. म्हणजे झोपेतच त्याचे प्राण गेले.

मसाझोच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याला गोड खाण्याची प्रचंड आवड होती आणि केक तसेच मिठाया त्याच्या विशेष पसंतीचे होते. ११३ वर्ष्याच्या आयुष्यात त्याने एकही दिवस नाश्ता चुकविला नाही. नाश्ता झाल्यावर तो नेमाने वर्तमानपत्र वाचत असे. त्याचे कुटुंब मोठे आहे. त्याने दोन लग्ने केली होती आणि त्याला पाच मुले आहेत. नातवंडे, पतवंडे आहेत. सुमो कुस्ती पाहण्याची त्याला आवड होती आणि टीव्हीवर तो कुस्ती बरोबरच अॅक्शन फिल्म्स पाहत असे. गरम पाण्यात बराच वेळ अंघोळ करण्याची त्याची सवय होती.

मसाझोने १०५ व्या वर्षी त्याची एज टेस्ट केली होती आणि त्यावेळी तो नातीबरोबर धावला होता. २५ जुलै १९०५ ही त्याची जन्मतारीख होती.

Leave a Comment