विराट-अनुष्कामुळे झाला रॉजर फेडररचा पराभव

roger-fedrar
रविवारी एका धक्कादायक निकालाची नोंद ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत करण्यात आली. दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचा ग्रीसच्या स्टेफानो त्सित्सिपास याने पराभव केला. फेडररसारख्या नामांकित खेळाडूला वयाच्या २० व्या वर्षी अशाप्रकारे हरवणे ही मोठी कामगिरी समजली जात आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर त्याचवेळी फेडररच्या पराभवाचे खापर फोडले गेले.

विराट आणि अनुष्का फेडररच्या पराभवानंतर सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. ऑस्ट्रेलियन ओपनचे सामने पाहण्याचा आनंद ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या विराट आणि अनुष्काने लुटला. विरुष्काने यावेळी रॉजर फेडररची भेट घेतली. तिघांनी या भेटीदरम्यान एकत्र फोटोसुद्धा काढला आणि सोशल मीडियावर हा फोटो शेअरदेखील केला. फेडररचा या भेटीनंतर रविवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. लागोपाठ या दोन घटना घडल्यामुळे विरुष्काला ट्रोल करण्याची आयती संधी ट्रोलर्सकडे चालून आली. या संधीचा फायदा घेत ट्रोलर्सनी विरुष्काला ट्रोल करणारे मिम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. विराट-अनुष्का हे ‘पनौती’ आहेत, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली.

Leave a Comment