अॅमेझॉन विकत आहे प्लास्टिकच्या बाटलीची चप्पल; किंमत 1423 रुपये

sliper
ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर प्लास्टिकच्या बाटलीपासून तयार केलेली चप्पल चक्क 1423 रुपयांना विक्रीला ठेवण्यात आली आहे. ही चप्पल आता कोण विकत आहे असा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असले. पण ही चप्पल न्यूझीलंडमधील एक महिला ऑनलाइन पद्धतीने विकत आहे. या चपलेचा आता टाकाऊपासून टिकाऊ म्हणून प्रयोग ठिक आहे. पण या चपलेची किंमत म्हणून एवढी का असा प्रश्न देखील तुम्हाला भेडसावत असेल. ही चप्पल या किमतीमुळे कोण विकत घेणार असा प्रश्न जरी उपस्थित झाला असला तरीही ऑनलाइन काहीही विकायला ठेवले जाऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

सध्या सोशल मीडियावर या बाटल्यांच्या चपलांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एखाद्या स्लिपरप्रमाणे अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने ही चप्पल बनवण्यात आली आहे. ‘अॅमेझॉन इंडिया’वर काही दिवसांपूर्वीच नारळाच्या करवंट्या आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तू चक्क ५०० ते १५०० हजार रुपयांना विकल्या जात होत्या. चक्क तीन हजारांना नारळाच्या करंवटीपासून तयार केलेला कप विकला जात होता. ५५ % सूट देऊन हा कप तब्बल १,३०० रुपयांना विकला जात असल्याची बाब या ट्विटर अकाऊंटवरून निदर्शनास आणून दिली.

Leave a Comment