भाऊ कदम, सागर कारंडे घेऊन येत आहे ‘श्री कामदेव प्रसन्न’

bhau-kadam
लवकरच हंगामा प्लेच्या आगामी मराठी ओरिजिनल वेबसीरिजमध्ये विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेला भाऊ कदम झळकणार आहे. या वेबसीरिजचे नाव श्री कामदेव प्रसन्न असे असून भाऊसोबत या वेबसीरिजमध्ये प्रसिद्ध विनोदवीर सागर करंडे, अभिनेत्री भाग्यश्री मोटे, आशा शेला आणि विनय येडेकर यांच्याही भूमिका आहेत.

या वेबसीरिजबाबत बोलताना भाऊ कदम म्हणाला की, मी या नव्या वेब सीरिजसाठी शूटिंग सुरू केले असून मी यामध्ये आयुष्यातील काही मजेशीर प्रसंगांमध्ये सागरला मदत करताना दिसेन. माझी यातील व्यक्तिरेखा शब्दश: या पृथ्वीवरील नाही. खरे तर माझी व्यक्तिरेखा हाच त्याच्या आयुष्यातील गोंधळाचे कारण आहे. मला हंगामा प्लेसोबत एका डिजीटल मालिकेत काम करायला मिळत आहे याचा आनंद आहे. रोचक कथा सांगण्याची डिजीटल माध्यमाने संधी दिली आहे आणि यामुळे कोणत्याही कलावंतांना अडसराशिवाय काम करण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे.

आपल्या वेबसीरिजमधील भूमिकेविषयी बोलताना सागर कारंडे म्हणाला, यात मी एका लाजाळू आणि अंतर्मुख माणसाची भूमिका साकारत आहे. काही अनोख्या परिस्थिती या माणसाच्या आयुष्यात येतात आणि त्या त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. त्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्याला भाऊ कदमच्या व्यक्तिरेखेने दिलेली मदत स्वीकारावीच लागते आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात आणखी गोंधळ होतो. त्यातून काही विनोदी क्षण निर्माण होतात. मला आणि अन्य सर्व कलाकारांना आमच्या अनोख्या अवतारांमध्ये या मालिकेत पाहणे प्रेक्षकांसाठी खूप मजेशीर असेल अशी मला खात्री आहे.

Leave a Comment