शाळेत मुख्याध्यापकाने केला बोल्ड डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

dance
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चीनमध्ये एका शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थींसमोर बोल्ड डान्स केला. 40 वर्षीय जैंग पेंगफी (Zhang Pengfei) असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पेंगफी प्रत्येक काम जरा हटके पद्धतीने करणे पंसद करतात. पेंगफी यांनी शाळेत कवायत करताना चक्क विद्यार्थीसमोरच बोल्ड डान्स केला आणि विद्यार्थींकडून ही करुन घेतला. मुख्याध्यापकाने कवायत करताना मॉर्डन डान्स केला. आणि हे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.

पेंगफीने ब्रेक टाईमाच्या वेळी विद्यार्थींनाबाहेर बोलविले आणि त्याचा सोबत Jazz गाण्यावर डान्स केला. पेंगफी म्हणाले की, “या शाळेतील ही एक छोटीशी अॅक्टीव्हीटी आहे. मला असे वाटते की, ब्रेक टाईममध्ये असेच व्यायाम करण्यात यावे. चीनच्या शांगजी येथील शाळेतील या मुख्याध्यापकांचा डांसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक विद्यार्थींसमोर उभे राहून डान्स करीत आहे. मुले देखील त्यांच्या सारखा डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्याध्यापक आश्चर्यचकित झाले आहे. त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Leave a Comment