‘या’ साधूने 44 वर्ष नाही ठेवले जमिनीवर पाय

baba
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेला कुंभ मेळा अनेक गोष्टीमुळे चर्चेत आहे. देश-विदेशातून लाखो लोक कुंभमेळ्यासाठी येत आहेत. दरम्यान एका साधूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. baba2
श्री महंत राम कृष्ण दास त्यागीजी महाराज असे या साधूचे नाव आहे. त्यांना ‘मचान वाले बाबा’ (Machaan wale baba) देखील म्हटले जाते. ‘मचान वाले बाबा’ अनोख्या पध्दतीने साधन करतात. त्याचा असा दावा आहे की, 1975 पासून त्यांनी जमिनीवर पाऊल ठेवलेले नाही. ते खुपच कमी जमिनीवर आपले पाय ठेवतात.
baba1
‘मचान वाले बाबा’ जास्त करुन जमिनीपासून लांबच राहतात. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, ‘मी लोकांना मंचावरुनच आशीर्वाद देतो आणि त्याच्या शुभेच्छा स्वीकारतो.’ त्यांचा मंडप 24 तास उघडे असते आणि दररोज सुमारे 5,000 भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी येतात.

या साधुचा मंडप सर्वासाठी खुला असतो. ते भाविकांची तपासणी देखील करतात. जर एखाद्याची तब्येत खराब असेल तर ते त्याच्यावर उपचार करतात.

त्यांचा मंडप इतका मोठा आहे की त्यात एकावेळी 5 हजार लोक राहू शकतात. ते कुंभ मेळाव्यात आलेल्या भाविकांना ही सुविधा पुरवितात. अनेक साधु-संत कुंभमेळ्यात चर्चेचे विषय बनलेले आहे. कुंभमेळ्यात सुमारे 15 करोड भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम जगभरात अध्यात्म आणि एकतेसाठी प्रसिद्ध आहे. 55 दिवसांचा कुंभ मेळा गेल्या मंगळवारी सुरू झाला असून तो 4 मार्च पर्यंत चालणार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment