भाजपच्या निवडणूक प्रचाराचा नारळ अमित शहा पश्चिम बंगालमध्ये फोडणार

amit-shah
कोलकाता – मालदा येथे रॅली करून बुधवारी पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या लोकसभा निवडणूक प्रचाराला भाजप अध्यक्ष अमित शहा सुरुवात करतील. शनिवारी कोलकात्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावतीने विरोधकांच्या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

उत्तर बंगालचा सीमावर्ती जिल्हा असलेला मालदा हा अनेक वर्षे काँग्रेसचा गड होता. काँग्रेस नेते एबीए गनी खान चौधरी आणि त्यांच्या कुटुंबियांचा येथे दबदबा होता. पण गेल्या २०११ मध्ये सत्ता परिवर्तनानंतर तृणमूल काँग्रेसने येथे आपला दबदबा निर्माण केला आहे.

याबाबत माहिती देताना भाजपचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा म्हणाले, मालदा जिल्ह्यातून बुधवारी बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अमित शहा सुरुवात करतील. यानंतर २३ जानेवारीला झारग्राम आणि बीरभूम जिल्ह्यातील सुरी येथे त्यांच्या दोन सभा होतील. रविवारपासूनच शहा यांच्या प्रचार रॅलिला सुरुवात होणार होती. पण त्यांना स्वाईन फ्लूमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते.

Leave a Comment