
लंडन – महाराष्ट्राचे लोकनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमधील (ईव्हीएम) घोटाळा माहीत झाल्यामुळेच त्यांची हत्या झाली आहे, असा खळबळजनक खुलासा सायबर तज्ज्ञाने इंग्लंडमध्ये पत्रकार परिषदेत केला आहे.
ईव्हीएम घोटाळा माहीत असल्यामुळेच झाली गोपीनाथ मुंडे यांची हत्या
या तज्ज्ञाचे नाव सयद शुजा, असे असून, ते ईव्हीएमचे डिझाईन तयार करणाऱ्या टीमचे सदस्य होते. पत्रकार परिषदेत तो उपस्थित नव्हता. पण तो मोठ्या स्क्रीनवर दिसत होता. तर इतर दोन तज्ज्ञांनी पत्रकार परिषदेते धक्कादायक खुलासे केले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुका पारदर्शक नव्हत्या, असाही दावा या तज्ज्ञांनी यांनी केला आहे.
