सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘कलंक’च्या सेटवरील आलियाचा हा फोटो !

alia-bhatt
सध्याच्या घडीला सोशल मीडियावर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा प्रचंड होत आहे. त्यांच्या नात्याला या दोघांच्या कुटुंबियांकडून मंजूरी ही देण्यात आली असल्याचे सांगण्यात आहे. यादरम्यान, सोशल मीडियावर आलियाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ती यात नववधुच्या लूकमध्ये दिसून येत आहे.


आगामी ‘कलंक’ चित्रपटाच्या सेटवरील आलियाचा हा फोटो आहे. लाल रंगाच्या लहेग्यांत यात ती खूपच सुंदर दिसत आहे. दोन्ही हातात कलीरे बांधलेले असून पारंपरिक पद्धतीने लाल रंगाची ओढणी घेतली आहे. हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत असून यामुळे आलियाच्या लग्नाबद्दल ही चर्चा होत आहे. कलंक चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस १८ जानेवारी होता. शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती आलिया आणि वरुण धवनने सोशल मीडियावर चाहत्यांनी दिली. यासोबतच एक फोटो ही शेअर केला. हा चित्रपट १९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.